रढावन येथे समाजीक सभागृहाचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील रढावन येथे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा २५१५ योजनेच्या अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.अंदाजित ७ लक्ष किंमतीच्या सभागृहाच्या माध्यमातून गावाच्या विकासात भर पडणार आहे.
यावेळी बाजार समितीचे प्रशासक प्रा.सुरेश पाटील,नगरसेवक दीपक पाटील,आत्मा कमिटी सदस्य सुनील पवार उपस्थित होते.
तसेच सरपंच सुंदरबाई धुमाळ पाटील,उपसरपंच नाना धनाजी पाटील, सदस्य शांताराम उत्तम पाटील, आनंदा शांताराम पाटील, संगीता सूर्यवंशी, ताराबाई सोनवणे, माजी सरपंच वसंत पाटील,सुंदरपट्टी चे भास्कर पाटील,उत्तम पाटील,पो.पा.रढावन गोरख पाटील,पो.पा.राजोरे यशवंत पुंडलिक पाटील, किसन लोटन पाटील, पंकज पाटील, छगन पाटील, दशरथ पाटील, साहेबराव पाटील, विश्वास गजानन पाटील, अधिकारी हिंमत पाटील, मन्साराम पाटील, प्रकाश सिताराम पाटील,रामकृष्ण पाटील, विश्वास पाटील,पुंडलिक पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
