के. के. वाघ कृषी महाविद्यालय नाशिक यांच्यामार्फत मोहाडी प्र.डांगरी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

मोहाडी प्र. डांगरी (प्रतिनिधी)-धुळे तालुक्यातील मोहाडी प्र.डांगरी येथे नुकतेच ग्रामीण कृषी कार्यानुभव ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा ही नाशिक येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षातील विद्यार्थी प्रांजल प्रमोद पाटील व प्रतिक संभाजी पवार ह्या कृषिदूतांमार्फत आयोजित करण्यात आली होती.यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे तांत्रिक पद्धतीने निराकरण कसे करावे ,सेंद्रिय शेती द्वारे उत्पन्न कसे वाढवावे,जमिनीतील सेंद्रिय कार्बन चे प्रमाण एक टक्क्यांच्या पुढे नेण्यासाठी आंतरपीक, फेरपालट पद्धती, दशपर्णी अर्क तयार करण्यासाठी उपयुक्त दहा वनस्पती आपल्या सभोवताली असून त्यांचा वापर केल्यास महागडी कीटकनाशके न वापरात जैविक पद्धतीने कीड नियंत्रण कसे करता घेऊ शकते त्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे कृषिदूत प्रांजल पाटील व प्रतिक पाटील यांनी मार्गदर्शन केले.त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिष हाडोळे, वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अभिमन राठोड आदी शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले
सदर कार्यशाळेस मोहाडी सह परिसरातील असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते. कृषी सहाय्यक प्रमोद पाटील यांनी ह्या प्रसंगी गावातील सुपीकता निर्देशांकानुसार द्यावयाची खत मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्यांची पिकांना कशी गरज असते, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी, तसेच तणनाशकांचा भरमसाठ वापराने सुपीक जमीन कशी नापीक आपण स्वतःच करित आहोत याचे अतिशय विस्तृत पद्धतीने मार्गदर्शन केले. ह्याप्रसंगी त्यांनी मोहाडी गावातील प्रमुख अन्नद्रव्यांचा सुपीकता निर्देशांक चा तक्ता डिजिटल पद्धतीने दाखवला.ह्याप्रसंगी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती कडे वळल्यास जमिनीची गुणवत्ता पण सुधारेल त्याचबरोबर आपण उत्पादित केलेल्या मालाला जास्तीचा बाजारभाव पण मिळेल .
असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाल्यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी प्रांजल पाटील व प्रतिक पाटील यांचे त्याबद्दल अभिनंदन केले. ह्याप्रसंगी मोहाडीचे उपसरपंच विलास गुजर कृष्णा ऍग्री चे रवी पाटील, भिमराव पाटील,दिपक गुजर, अविनाश खैरनार, राजू पाटील, बापू सोनजे, विलास खैरनार, आबा नांदरे, रिंकू पाटील, सुभाष पाटील, भूषण सूर्यवंशी, शिल्पन गुजर ,कुरवेल ता. चोपडा येथील शेतकरी बंधू आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरंजन पेंढारे यांनी केले तर इंजि. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.