राष्ट्रीय महामार्ग क्र.6 चे निकृष्ट काम ; 12 सप्टेंबर रोजी शिवसेनेतर्फे पारोळा येथे रास्ता रोको

0

पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने व निकृष्ट दर्ज्याचे सुरु असून सद्यस्थितीत अजंग ते तरसोद या टप्प्यात नव्या व जुन्या दोन्ही महामार्गांवर रस्त्याला खोलवर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे दिवसाला अनेक अपघात होवून मोठी जिवितहानी होत आहे. खराब रस्त्यावर किंवा काम सुरु असल्याचा बऱ्याच ठिकाणी सूचना फलक अथवा मार्गदर्शन चिन्ह देखील लावलेले नाहीत. त्यामुळे रहदारी करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून सदरील कामाला गती मिळावी, रस्त्यावर पडलेले खोलवर खड्ड्यांना तात्काळ उच्च दर्जाच्या कामाने डागडूगी करण्यात यावी, निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी या मागणीसह तीव्र निषेध व्यक्त करत आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वात व पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा शिवसेनेतर्फे रास्ता रोकोचे आयोजन १२ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी सकाळी ११:३० वाजता दुर्गा पेट्रोल पंपाच्या पुढे(बायपास), राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, म्हसवे शिवार, पारोळा येथे करण्यात आलेले आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पारोळा शिवसेनेतर्फे करण्यात आलेले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!