ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन;जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे यांचे निवेदन

0

पारोळा (प्रतिनिधी)- जिल्हा आणि तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर ग्रामरोजगार सेवक मनरेगाची पूर्ण कामे करीत आहेत त्यानुसार शासनाने ग्रामरोजगार सेवक यांना मनरेगा अंतर्गत पात्र जॉब कार्ड धारक मजुर व प्रशासन यांच्यातील मुख्य दुवा आहे असे शासनाने जाहिर केलेले आहे, त्यानुसार ग्रामरोजगार सेवक यांना सन दोन हजार अकरा पासुन सार्वजनिक व वैयक्तिक पद्धतीची जास्तीची कामे वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तसेच स्थानिक स्तरावर अधिकारी व कर्मचारी हे ग्रामरोजगार सेवकांना इतर कामासाठी त्यांचा पूर्णवेळ उपयोग करुण घेतात, तसेच ग्रामरोजगार सेवकांना मागील आठ ते दहा वर्षापासुन मनरेगाची जास्तच कामे वाढल्यामुळे काम करतांना ग्रामरोजगार सेवकांना खुपच अडचणी निर्माण होत आहेत त्याबाबत जिल्हा व तालुका स्तरावर बऱ्याच वेळेस तोंडी व लेखी स्वरूपाच्या समस्या मांडुन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे परत महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियनच्या प्रलंबित असलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय विविध समस्या सोडविण्याबाबत नरेगा आयुक्त नागपुर, जिल्हाधिकारी जळगांव मुख्य कार्यकारी अधिकारी जळगांव, तहसिलदार पारोळा आणि गटविकास अधिकारी पारोळा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णय दिनांक दोन मे दोन हजार अकरा नियुक्तिबाबत, शासन निर्णय सतरा मे दोन हजार बारानुसार ग्रामरोजगार सेवकांच्या सुधारित कर्त्तव्य व जबाबदाऱ्या, शासन निर्णय सव्विस फेब्रुवारी दोन हजार तेरा नुसार ग्रामरोजगार सेवकांना दरमहा टी ए डी ए देणे, नरेगा आयुक्त नागपुर यांचे ग्रामरोजगार सेवकांना सन दोन हजार तेरा पासुन थकित टी ए डी ए देणेबाबत पत्र, दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार विस रोजीचे पत्र आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जळगांव यांच्याकडील टी ए डि ए देणेबाबत दिनांक बावीस सप्टेंबर व दोन ऑक्टोबर दोन हजार विस रोजीचे पत्रानुसार शासकीय अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून शासनाच्या लेखी आदेशाने शेतकरी व शेतमजुर लखपती कारपती होईल त्यांचे कुटुंब दारिद्रयेरेषेच्या वरती येऊन उत्पन्न वाढ होऊन गरीबी हटेल अशा प्रकारचे शासकीय धोरण सफल होण्यासाठी आपल्या स्तरावरुन पुढील समस्या सोडविणेबाबत मुंदाणे प्र. उत्राण येथील ग्रामरोजगार सेवक सूर्यभान पाटील यांना कामावरून कमी करणेबाबत झालेली बेकायदेशीरपणे तक्रारी ठराव निकाली काढणेबाबत, दिनांक सोळा मार्च दोन हजार एकविस पासुन ते एकतीस ऑगस्ष्ट दोन हजार एकविस पर्यंतचे ग्रामरोजगार सेवकांचे थकित मानधन मिळणेबाबत, ग्रामरोजगार सेवकांचे सन दोन हजार तेरा पासुन थकित असलेले टी ए डी ए बिल मिळणेबाबत, तसेच मजुरांसाठी लागणारे नमुना अर्ज नंबर एक, नमुना चार, नमुना सात आणि जॉबकार्ड प्रति यानुसार वरील समस्याचे आपल्या स्तरावरुन योग्य निराकरण करण्यात यावे, निराकरण नाही झाल्यास महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक युनियन तर्फे पारोळा पंचायत समिती कार्यालयासमोर दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार एकविस रोजीपासुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल पुढील होणाऱ्या परिणामास आपण सर्वस्वी जबाबदार राहणार अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले, सदर निवेदनावर सुरेश पाटोळे जिल्हाध्यक्ष, शरद पाटील तालुकाध्यक्ष, प्रभाकर भोई उपतालुकाध्यक्ष, यूनियनचे जेष्ठ सदस्य कैलास पाटील उमेश बाविस्कर उत्तम पाटिल याच्या स्वाक्षऱ्या असुन निवेदन देतांना सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!