धनस्वी पाटील हिचा धुळे येथे झाला गुणगौरव व सत्कार!

धुळे (प्रतिनिधी) 10 सप्टेंबर रोजी “गणेश चतुर्थी” च्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामीनारायण मंदिर धुळे येथे महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे माजी कुलगुरू डॉ.के.बी.पाटील हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते धनस्वी दिपक पाटील (MTS परीक्षेत राज्यात द्वितीय आणि केंद्रात प्रथम क्रमांक) हिचा व इतर बक्षीस पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वागत सत्कार स्मृतिचिन्ह,अभिनंदनपत्र, गुणपत्रक आणि बक्षिसाची रक्कम असलेला धनादेश देऊन गुणगौरव करत, समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी डॉ.प्रकाश रामचंद्र भंगाळे यांच्या वैद्यकीय प्रॅक्टिस मधील रुग्णांच्या वेचक कथा, अनुभव, व वैद्यकीय मार्गदर्शन समाविष्ट असलेले “अमृतकलश” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.के.बी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तक परिचयात डॉ.पी.आर.भंगाळे यांनी पुस्तकाची ओळख आपल्या भावना अत्यंत निर्मळपणे आणि भावनिकपणे प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचवून करून दिली.
यावेळी पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे तोंड भरुन कौतुक केले. व याच पद्धतीने अभ्यास करत राहिल्यास तुमच्यातूनच भविष्यातील IAS आणि IPS विद्यार्थी तयार होऊ शकतात अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एमटीएस परीक्षा संचालक सुभाष महाजन सर यांनी MTS परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी धुळे जिल्हा MTS समन्वयक माळी सर, इतर अनेक मान्यवर व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

