आशासेविका संगिता माळी यांची तत्परता; महिलेची झाली सुखरूप प्रसूती!

दहिवद (प्रतिनिधी)भूषण महाजन
दहिवद ता.अमळनेर गावातील पावरा समाजाचा मजूर विकास पावरा यांची पत्नी गर्भवती असल्याने तिच्या पोटात प्रसूती कळा येत होत्या,आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने त्यांनी त्या महिलेची प्रसूती घरी करण्याचा निर्णय घेतला असता,त्यांनी गावातील आशा सेविका संगीता रमेश माळी यांना फोन केला.त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ दाखल झाल्या.फोन करून ॲम्बुलन्सही बोलावली.
विकास पावरा हे शेत मळ्यात असल्याकारणाने तिथपर्यंत ॲम्बुलन्स जाऊ शकत नव्हती म्हणून गर्भवती महिलेला बैलगाडीने रस्ता पर्यंत आणले आणि तिथून ॲम्बुलन्सने आशा सेविका यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणले,वेळेत वैद्यकीय सेवा तात्काळ मिळाल्यामुळे ती महिला सुखरूप प्रसूती झाली आणि तिला कन्यारत्न प्राप्त झाले.अशा कठीण काळात देवासारखे धावून आलेल्या संगीता रमेश माळी या आशा सेविकेचे गावात आणि परिसरात कौतुक होत आहे.
