अजय पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित!

0

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक महानगर आघाडी, जळगाव तर्फे ५ सप्टेंबर शिक्षकदिनानिमित्ताने श्री स्वामी समर्थ प्राथमिक विदयामंदीरचे (दादावाडी परिसर) पदवीधर शिक्षक अजय अशोक पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले. पुरस्कार प्राप्त श्री अजय पाटील इतिहास विषयात सेट उत्तीर्ण आहेत तसेच त्यांचे सिंधू संस्कृती (भारतीय इतिहासाचे सोनेरी पान) हे पुस्तक अथर्व प्रकाशनाने प्रसिद्ध केलें आहे. या पुस्तकाची नोंद बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विदयापिठ (उ.म.वि.) इतिहास विभाग ,प्राचीन भारताचा इतिहास या विषयासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून झालेली आहे.

पुरस्कार वितरणासाठी प्रमुख पाहुणे के. बी. पाटील (माजी कुलगुरू,क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव), डॉ.सतीश पाटील (माजी पालकमंत्री ), रविंद्र भैया पाटील (जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) कल्पनाताई पाटील( उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस),अभिषेक पाटील (महानगर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), अॕड.कुणाल पवार (महानगर सचिव राष्ट्रवादी काँग्रेस), दिव्या यशवंत भोसले( उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक राष्ट्रवादी काँग्रेस),स्वप्नील नेमाडे (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी) उपस्थित होते.

आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे शाळेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर सचिव विशाल देवकर
शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा महाजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकासराव निकम तसेच शिक्षकवृंद यांनी कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!