डी. ए. सोनवणे राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्रीमती इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांना नुकताच शिक्षक दिनी राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्काराने ज्ञानोदाय बहुउद्देशीय संस्था टाकळीभान श्रीरामपूर जि. अहमदनगर या संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले .
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, लहुजी कानडे आमदार श्रीरामपूर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला,यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. सुधीर तांबे आमदार, विधानपरिषद यांची उपस्थिती होती .
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यीक डॉ.बाबुराव उपाध्ये, डॉ . शीरिष लांडगे अध्यक्ष- मराठी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.वंदना मुरकुटे,पंचायत समिती सदस्या श्रीरामपूर, राष्ट्रसंत डॉ.ज्ञानेशानंद शास्त्री महाराज,श्रीरामपूर गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी, ग्रामीण कवी पोपटराव पठारे, टाकळीभान सरपंच अर्चना रणनवरे, निसर्ग व सामाजिक पर्यावरण महाराष्ट्र राज्य मंडळाचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारे, ह. भ. प. दत्तात्रय बहिरट महाराज- जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद अहमदनगर, उद्योजक- ऋषीकेश वाबळे, प्रकाश कुलथे, बाळासाहेब सागडे, अशोक नाना कानडे, श्रीरामपूर तालुका कृषी पर्यवेक्षक अभयकुमार बोरसे, श्रीमती एस. एस. अहिरे मॅडम, आदी उपस्थित होते .
सदर कार्यक्रमाचे आयोजक ज्ञानोदाय बहुउद्देशीय संस्था कार्याध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष देविदास बनकर,अध्यक्ष तुषार दाभाडे आदी संचालक मंडळ उपस्थित होते .
सदरच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांचे संस्थाध्यक्ष प्रकाश मुंदडा, चिटणीस राजु मुंदडा, सहचिटणीस योगेश मुंदडा, सर्व कार्यकारिणी संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक संदीप पवार, शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी,सामाजिक स्तरातून, मंगलमूर्ती नगर वाशीय ,आप्तेष्ट,नातेवाईक, पत्रकार मित्र,आदी स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.