डॉ. पाकिजा पटेल यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लाईफटाईम अचीवमेंट शिक्षक पुरस्कार

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील आदर्श गाव राजवड येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तथा महिला शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. निशा फाउंडेशन बेंगलोरकडून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड 2021 ची घोषणा करण्यात आली. देशभरातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण, इत्यादी क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने त्यांना पुरस्कार बहाल करण्यात आला. या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे