माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

अमळनेर (प्रतिनिधी) माजी केंद्रीय मंत्री तथा राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांच्या ७९ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी विविध कार्यक्रम घेण्यात आले.
शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) व विजयनाना पाटील आर्मी स्कुल यांच्या तर्फे ढेकू रोड वरील टेकडीवर वृक्षारोपण करून पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला. सरकारी वकील ऍड राजेंद्र चौधरी, आर्मी स्कुलचे प्राचार्य पी एम कोळी, भरवसचे पोष्टमास्टर मिलिंद पाटील, माजी सैनिक ज्ञानेश्वर पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जी.पी. हडपे, ए.ए. वानखेडे, एस. एन. महाले, उमेश काटे, वेदिका पाटील, दक्षता काटे, शाहूराजे काटे आदी उपस्थित होते.
▶️ दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट
स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे, ही बाब ओळखून ऑनलाइन च्या माध्यमातून शहरासह दऱ्या खोऱ्यातील सुमारे दोन हजार विद्याथ्यांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेऊन शिवशाही फाऊंडेशन (अमळनेर) व नवलभाऊ प्रतिष्ठान यांच्या तर्फे सामान्य ज्ञानावर आधारित “ऑनलाइन सामान्य ज्ञान स्पर्धा” घेण्यात आली. नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद शिक्षण संचालक प्रा सुनील गरुड यांच्या हस्ते या स्पर्धेचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. आर्मी स्कुलचे प्राचार्य पी एम कोळी हे अध्यक्षस्थानी होते. नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील, शिवशाही फाऊंडेशनचे अध्यक्ष जयेशकुमार काटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ऑनलाइन प्रश्नावली सोडविल्यानंतर प्रत्येक सहभागी स्पर्धकाला तात्काळ “ऑनलाइन प्रमाणपत्र” देण्यात आले. स्पर्धा समन्वयक म्हणून आर्मी स्कुलचे शिक्षक उमेश काटे, टी. के.पावरा व मोहित मावळे यांनी काम पाहिले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन उमेश काटे यांनी तर आभार शरद पाटील यांनी मानले.

▶️ शिक्षक, शिक्षिका यांचा गौरव
विजयनाना पाटील आर्मी स्कूल,अमळनेर येथे ‘शिक्षक दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कोविड परिस्थितीमध्ये मुलांच्या गैरहजेरीत सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान शाळेचे प्राचार्य पी. एम. कोळी, सुभेदार मेजर नागराज पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस.ए. बाविस्कर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. एस.ए. बाविस्कर यांनी नानासाहेबांच्या कार्याचा आढावा घेतला. प्राचार्य कोळी सर यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकाचे काय महत्व असते यावर प्रकाश टाकला. आदरणीय नानासाहेब यांच्या जीवनावर आधारित देखील मार्गदर्शन केले. यावेळी विनोद सोनवणे याने प्राचार्य पी एम कोळी यांचे तयार केलेले स्केच चित्र भेट स्वरूप देण्यात आले. सुत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
