बोरी धरणाचे 15 दरवाजे उघडले; काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

पारोळा (प्रतिनिधी)तामसवाडी ता.पारोळा येथील बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणात 100%पाणीसाठा झालेला आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने बोरी धरणाचे 15 दरवाजे 0.40 ने उघडले आहे तसेच पुराचे पाणी नदी पात्रातील विसर्ग जास्त वाढण्याची शक्यता आहे
बोरी धरणाचे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. कृपया जीवित वा वित्त हाणी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन एरंडोल प्रांताधिकारी विनय गोसावी, पारोळा तहसीलदार अनिल गवांदे व अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आवाहन केले आहे.