नंदगांव येथे राममंदिर सभा मंडपाचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नंदगांव येथील प्रसिद्ध व पंचक्रोशीचे धार्मिक स्थळ असलेल्या राममंदिरच्या सभामंडपाचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.अंदाजित ७ लक्ष रुपये किंमतीच्या सभामंडपामुळे मंदिराच्या परिसराचे सुशोभीकरण होऊन गावाच्या विकासात भर पडणार आहे.
यावेळी प.पू. ईश्वरदासजी महाराज(राममंदिर),सरपंच मंगलाबाई सुधाकर पाटिल, रमेश दत्तू पाटील,पृथ्वीराज पाटील, खुशाल हिलाल पाटील, सुभाष तुकाराम पाटील,शरद पंढरीनाथ पाटील, लोटन हिलाल पाटील, मोतीलाल प्रभाकर पाटील, भानुदास गंगाराम पाटील, युवराज हिंमत पाटील, बाळा पवार, पप्पू बाबूलाल पाटील, किशोर दिनकर पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.