15 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा पुरस्कार जाहीर!

जळगाव (प्रतिनिधी) 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनानिमीत्त देण्यात येणाऱ्या शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी १५ प्राथमिक शिक्षकांच्या नावाचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठविला होता . त्यानुसार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रस्तावांना मंजूरी दिली असून १५ पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहे .
सन २०२०-२०२१ या कालावधीसाठी प्राथमिक शिक्षकांच्या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील १५ शिक्षकांची निवड करण्यात आली होती . त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने विभागीय आयुक्तांकडे मंजूरीसाठी पाठविला होता . या प्रस्तावाला आज रोजी मंजूरी देण्यात आली असून १५ प्राथमिक शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली आहे .
▶️ पुरस्कारार्थी शिक्षक:-
दिनेश रमेश मोरे (मारवड ता . अमळनेर),मनिषा सुपडू पाटील ( वढवे ता.भडगाव ),नामदेव शालीग्राम महाजन (मोंढाळे ता . भुसावळ),योगेश मुरलीधर गाटे (दादानगर नाडगाव ता.बोदवड), ओमप्रकाश रतन थेटे(पिंपळगाव प्र.दे ता.चाळीसगाव),सोमनाथ खंडु देवराज(वेले आखतवाडे ता . चोपडा),माधुरी उत्तम देसले (दोनगाव खु.ता.धरणगाव),पद्माकर काळु पाटील(टाकरखेडा ता.एरंडोल),मोनिका विजय चौधरी (वडली ता.जळगाव),माया प्रकाशराव शेळके(खादगाव ता.जामनेर),विकास ज्ञानदेव पाटील(उच्च टाकळी ता.मुक्ताईनगर),सुभाष संतोष देसले,(चिंचपुरे ता.पाचोरा ),सीमा विठ्ठल पाटील(हिवरखेडे खु.ता.पारोळा) गजाला तबस्सुम सैय्यद असगर अली,(रावेर),संदीप सुरेश पाटील,(डांभुर्णी ता.यावल) या शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.