5 सप्टेंबर रोजी शिवसेनेतर्फे पारोळा व एरंडोल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा उद्घाटन!

पारोळा (प्रतिनिधी) शिवसेना नेते, विधीमंडळ गटनेते तथा राज्याचे नगरविकासमंत्री ना.श्री.एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतुन आमदार चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खा.डाॕ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल, पारोळा व भडगांव तालुक्यातील गोर-गरीब, सर्वसामान्य व गरजु रूग्णांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन तसेच वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व खा.डाॕ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पारोळा व एरंडोल तालुक्यातील गरीब व गरजु रूग्णांना भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा उद्घाटन सोहळा मंगेश चिवटे,कक्षप्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते ०५ सप्टेंबर २०२१ रविवार रोजी सकाळी १०ः०० वाजता आयोजित केलेला आहे.
▶️ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे उद्घाटन वेळ व ठिकाण –
सकाळी १० वाजता – कानबाई औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तांबे नगर, कजगांव रोड, पारोळा
➡️ भव्य मोफत आरोग्य तपासणी
शिबीराचे वेळ व ठिकाण -पारोळा
▶️ सकाळी १०ः३० वाजता – पाताळेश्वर मंदीराजवळ, पारोळा
▶️ सकाळी १०ः४५ वाजता – भवानीगड (झपाट भवानी मंदीर), पारोळा
▶️ सकाळी ११ः३० वाजता – श्री मारोती मंदीर, गांधीपुरा, एरंडोल
सकाळी ११ः४५ वाजता –
▶️डाॕ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, एरंडोल