उद्योजक श्रीराम पाटील यांनी शिवसेनेत येऊन विधानसभा लढवावी!- आ.चंद्रकांत पाटील

रावेर (प्रतिनिधी)उद्योजक श्रीराम पाटील यांनी शिवसेनेत येवून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवावी असे आवाहन मुक्ताई नगर चे आमदार चंद्रकांत पाटील येथे केले.
येथील उद्योजक श्रीराम पाटील यांच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यात श्रीराम फौंडेशनच्या वतीने अॅम्बूलन्स लोकार्पण व ग्रामीण भागातील २५ गावांत वाचनालयांना पुस्तके वाटप करण्यात आले. त्यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी कौतुकाचा वर्षाव करत उद्योजक श्रीराम पाटील यांनी शिवसेनेत येवून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा लढवावी असे खुले आवाहन केले. व नक्कीच जिंकणार असा दावाही त्यांनी यावेळी केला.
जि. प. अध्यक्षा रंजना पाटील यांनी श्री. पाटील यांनी शुन्यातून विश्व निर्माण करून ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात असे मनोगत व्यक्त केले. श्रीराम पाटील यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी आमदार शिरीष चौधरी, आ. चंद्रकांत पाटील यांचे सह, प्रा. गोपाल दर्जी, नगराध्यक्ष दारा मोहंमद, दर्जी फौंडेशनचे गोपाल दर्जी, ग.स. सोसायटी अध्यक्ष मनोज पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष राम पवार, अखिल भारतीय केळी महासंघ अध्यक्ष भागवत पाटील, जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, कन्हैय्यालाल अग्रवाल, विनोद तराळ, प्रा.डी.डी. बछाव, राष्ट्रवादी किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील, मराठा विकास मंडळ अध्यक्ष राहूल पंडीत, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, तालुका प्रमुख योगीराज पाटील, रविंद्र पवार, माऊली हॉस्पिटल चे संचालक डॉ. संदिप पाटील, नगरसेवक अॅड.सुरज चौधरी, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, माजी जि. प. सदस्य रमेश पाटील, सुरेश पाटील, यु.डी. पाटील, पद्माकर महाजन, अशोक शिंदे, दिलीप कांबळे आदि उपस्थित होते.
श्रीराम फौंडेशनचे संचालक व सदस्यानी कार्यक्रमाचे नियोजन केले .