शिंपी समाज आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षपदी छाया इसे,उपाध्यक्षपदी नेत्रा भांडारकर तर सचिवपदी मनिषा शिरसाठ

अमळनेर (प्रतिनिधी) शिंपी समाज आदर्श महिला मंडळ अमळनेर या मंडळाची वार्षिक सभा नुकतीच जेष्ठ सदस्या रत्नमाला जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संत नामदेव महाराज मंदिरात झाली.यावेळी पातोंडा येथील रहिवासी असलेल्या उपशिक्षिका छाया अशोक इसे यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली . तसेच पुढीलप्रमाणे मंडळाची कार्यकारिणीची सुध्दा एकमताने निवड करण्यात आली.ती अशी, उपाध्यक्ष नेत्रा भांडारकर , सचिव मनिषा संजय शिरसाठ , उपसचिव प्रतिभा भालचंद्र सोनवणे , खजिनदार जयश्री धनंजय शिंपी , जेष्ठ सल्लागार रनमाला जगताप , मीनाक्षी लक्ष्मण खैरनार , उषा भांडारकर तसेच कार्यकारणी सदस्य म्हणून मंगला सोनवणे , आशा सुधाकर भामरे , जयश्री प्रदीप भांडारकर , रंजना वासुदेव मांडगे , चंदा धर्मेंद्र खैरनार , भारती उमेश भांडारकर , लता खैरनार , सुरेखा पुरूषोत्तम जगताप यांची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला . या वेळी महिला प्रबोधनात्मक विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष छाया इसे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.