रौप्य महोत्सव स्वातंत्र्याचे मानाचे ध्वजारोहण सैनिकांच्या शुभ हस्ते

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मालपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाचे आज 15 ऑगस्ट 2021 रोजीचे भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन आणि 75 वा स्वातंत्र्य दिवसाचे राष्ट्रीय ध्वजारोहण भारतीय नौदलाच्या सेलर पदी कार्यरत असलेले सुमित कुमार शशिकांत पवार या सैनिकाच्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सरपंच ताई पंढरीनाथ पवार उपसरपंच सचिन भिमराव पवार तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रवीण विनायक पाटील, रेखाताई संजय पाटील, जतन बाई दशरथ पाटील, दमोंता बाई पाटील, तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे माजी सभापती आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पवार आणि अमळनेर पंचायत समिती सदस्य कविता प्रफुल्ल पवार आदी ग्रामस्थ आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते माता-भगिनी उपस्थित होते. इंडियन नेव्ही त कार्यरत सेलर सुमित पवार हे अमळनेर येथील श्री एन टी मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील कार्यरत शिक्षक श्री शशिकांत हिम्मतराव पवार यांचे सुपुत्र आहेत.