रामेश्वर खुर्द येथे 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रामेश्वर खुर्द ग्रामपंचायत येथे गजेंद्र रमेश वंजारी सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामेश्वर खुर्द येथे निवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ आनंदा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहन केल्यानंतर गोकुळ पाटील यांनी सांगितले की, 1ली
ते 5 दरवर्षी गुणवत्तेत वर्गात 1 ल्या येणाऱ्या विद्यार्थीस बक्षीस दिले जाईल असे जाहिर केले. 1लीत पहिला येणारा 101रूपये,2रीत पहिला 201रूपये,3रीत पहिला 301रूपये,4थीत पहिला 401रूपये,5वीत पहिला 501रूपये याप्रमाणे या वर्षापासूनच बक्षीस वितरण करण्यात आले.
पुढील प्रमाणे इयत्ता 1ली उदय संदिप पाटील याला रामकृष्ण शिवाजी पाटील यांच्या हस्ते 101रूपये देण्यात आले. अस्मिता अंकूश बंजारा 2री हिस परशू झामू वंजारी डे.सरपंच यांच्या हस्ते देण्यात आले. हिमांशी किरण पाटील इयत्ता 3री हिस अविनाश प्रताप वंजारी पोलिस पाटील यांच्या हस्ते 301रूपये बक्षीस देण्यात आले. यशोमती भगवान पाटील इयत्ता 4 थी हिस प्रमिला गोकुळ पाटील अंगणवाडी कार्यकर्ती रामेश्वर खुर्द यांच्या हस्ते 401रूपये बक्षीस देण्यात आले. खुशी राजेंद्र पाटील इयत्ता पाचवी हिस 501रूपये गजेंद्र रमेश वंजारी सरपंच रामेश्वर खुर्द ता.अमळनेर याप्रमाणे बक्षीस वितरण सोहळा झाला.
यावेळी गोकुळ पाटील यांनी सांगितलं की, मी दरवर्षी हयात आहे. तोपर्यंत मी बक्षीस देईल. शिक्षण घेत असताना कोणत्याही विद्यार्थीस काही अडचण आल्यास मला सांगा माझ्यापरीने मी मदत करेल. आपणास शिक्षण घेतांना प्रेरणा देणारे आई,वडील,समाज,मित्र,शिक्षण प्रेमी ,शिक्षक,वेगवेगळ्या संस्था त्यातील सरपंच, चेअरमन अध्यक्ष,सदस्य, शासन प्रशासन हे आपणास कसे प्रोत्साहीत करत असतात हे विस्तृत मार्गदर्शनकेले.
या वर्षी पासून पहिले येणारे विद्यार्थी यांना बक्षीस देण्यात आले. याठी श्री योगेश नानाभाऊ पाटील मुख्याध्यापक श्री योगेश पाटील,मनोहर पाटील तसेच पाटील मॅडम ,श्री प्रभाकर धुडकू पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी केला.
या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक,शिक्षणप्रेमी सर्व संस्थाचे अध्यक्ष,सदस्य ,चेअरमन उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन मनोहर पाटील यांनी केले
