नवलभाऊ प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलमध्ये 75 वा स्वातंत्र दिन साजरा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील नवलभाऊ प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलमध्ये कोविड 19 चे पालन करीत आज 75 वा स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इंजि. गोकुळ बोरसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विजयनाना पाटील आर्मी स्कूलचे प्राचार्य पी.एम. कोळी सर, आयटीआयचे प्राचार्य किरण बाविस्कर सर, आर्मी स्कूल चे प्रभारी कमांडंट तथा सुभेदार मेजर नागराज पाटील सर, हवालदार धनराज पाटील सर, बी एड चे प्राचार्य डॉ. पी.पी.चौधरी सर, डी टी एड चे प्राचार्य के.वाय.देवरे सर, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य सुदीप पाटील सर, कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य संदिप साळुंखे सर, हवालदार डी.पी. बोरसे सर, नायब सुभेदार भटू पाटील सर, बी.एड.महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जी.एन.चव्हाण तसेच माजी प्राचार्य पाचपांडे सर आदींसह सर्व शैक्षणिक संस्थांचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी हजर नसले तरी आर्मी स्कूलचा सातवी चा विद्यार्थी आशिष कुलकर्णी या विद्यार्थ्याने रेकॉरडेड देशभक्तीपर गीत सादर केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख उमेश काटे व क्रीडा शिक्षक आर.ए.घुगे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री नानासो विजय नवल पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासो अनिकेत पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील सर, संस्थेचे मानद सचिव प्रा. सुनील गरुड सर यांनी सर्व शिक्षकांना व विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या ऑनलाइन शुभेच्छा दिल्या.

