16 ऑगस्ट रोजी क्लासेस संघटने (PTA) मार्फत मोफत रंगभरण स्पर्धा!

अमळनेर (प्रतिनिधी) खाजगी कोचिंग क्लासेस संघटना(PTA)
अमळनेर व SSBT’S कॉलेज ऑफ इंजिनीअरींग, बांभोरी,जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने-इ.5 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी, स्वातंत्र्य
दिनाचे औचित्य साधून “मोफत रंगभरण स्पर्धा” सोमवार,दि.16 ऑगस्ट 2021रोजी-शहरातील एम.जे.हॉल,येथे आयोजित केलेली आहे.स्पर्धा उदघाटक-मा.सीमा अहिरे मॅडम,उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग,अमळनेर.असणार आहेत.स्पर्धा ही तीन गटात असेल.
गट-1)इ.5 वी,6 वी,7 वी
सकाळी 8.00 ते 9.00
गट-2)इ.8 वी,9 वी
सकाळी 9.30 ते 10.30
गट-3)इ.10 वी,11 वी,12 वी
सकाळी 11.00 ते 12.00 ह्या वेळात होईल.
विजेत्या स्पर्धकांना प्रथम,द्वितीय,तृतीय व
उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.आयोजकांमार्फत
फक्त कागद पुरविला जाईल.इतर रंगकामाचे
साहित्य स्पर्धकांनी सोबत आणावेत.स्पर्धकांनी
मास्कचा वापर व सोशल डिस्टनसिंग पाळणे
अनिवार्य राहील.सदरील स्पर्धा महाराष्ट्र शासन
यांच्या कोरोना महामारीच्या पूर्ण निर्बंधाचे पालन
करून घेण्यात येणार आहे,असे क्लासेस संघटना (PTA)अध्यक्ष व स्पर्धा प्रमुख भैय्यासाहेब मगर (9423904483)यांनी कळविले आहे.