जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे ग्रंथपालन वर्गाचे आयोजन

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा ग्रंथालय संघ संचलित ग्रंथपालन केंद्र जळगाव यांच्या तर्फे ग्रंथपालन वर्ग २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १२ ते २१ ऑगस्ट दरम्यान प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.
ग्रंथालय संचालनालयामार्फत जळगाव जिल्हा ग्रंथालय संघातर्फे ग्रंथपालन प्रमाणपत्र ऑनलाईन परिक्षा वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्समुळे प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, आदिवासी प्रकल्प विभाग, न्यायालये, सार्वजनिक वाचनालय आदी ठिकाणी ग्रंथपाल व सेवक म्हणून नोकरी मिळू शकते. यासाठी किमान १० वी पास पात्रता असणारे विद्यार्थी परिक्षा देऊ शकतात. प्रवेश अर्ज मिळण्यासाठी साने गुरुजी वाचनालय अमळनेर येथे तसेच जळगाव जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे कार्यवाहक संजय पाटील ९७६४०९६९०१ यांच्याशी संपर्क साधावा.