दुर्गाबाई काटे यांचे निधन;14 रोजी अंत्ययात्रा!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवाशी दुर्गाबाई भोगीलाल काटे (वय- ७६) यांचे आज संध्याकाळी 5 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.१४) सकाळी अकराला कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्या भोगीलाल काटे यांच्या पत्नी तर अंजनविहिरे (ता धरणगाव) येथील माध्यमिक विद्यालयाचे शांतीलाल काटे यांच्या मातोश्री होत.