आयडीबीआय बँकेत होणार 650 पदांची भरती!

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आयडीबीआय बँकेने असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकुण 650 पदे भरली जाणार आहे. बँकेने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले असून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
आयडीबीआय बँकेकडून एकूण 650 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड पदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख 22 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 4 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
आयडीबीआय बँकेने एका वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्स इन बँकिंग अँड फायनान्स यासाठी अर्ज मागवले आहेत. यामध्ये नऊ महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन केले जाईल. तर, तीन महिने इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार आहे. हा डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना बँकेकडून प्रमाणपत्र दिले जाईल आणि आयडीबीआय बँक मध्ये असिस्टंट मॅनेजर पदावर त्यांना काम करण्याची संधी दिली जाईल. हे उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता यावर आधारित असेल.
अर्ज करणारा उमेदवार हा भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60 टक्के गुणांसह पदवीधर झालेला असावा. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे. एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही अट 55 टक्के निश्चित करण्यात आलीय. उमेदवाराचे वय 21 ते 28 च्या दरम्यान असावं.
आयडीबीआय बँकेने एससी, एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलंय. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं आहे.
आयडीबीआय बँकेने 2021 मधील भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेने विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयडीबीआय बँक कार्यकारी पदांवर कंत्राटी पद्धतीने पात्र उमेदवारांची देशभरातील विविध शाखांमध्ये नेमणूक करणार आहे. कार्यकारी पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 4 ऑगस्ट पासून झाली असून अखेरचा दिवस 18 ऑगस्ट आहे. 920 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पात्र उमेदवार आयडीबीआय बँकेचा अधिकृत वेबसाईट idbibank.in वर जाऊन अर्ज दाखल करू शकतात. बँक कार्यकारी पदावरील उमेदवारांची नियुक्ती फक्त एका वर्षासाठी करण्यात येणार आहे. उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षापर्यंत वाढवला जाऊ शकतो.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!