आ.अनिल पाटील यांच्या हस्ते कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वितरित

पारोळा (प्रतिनिधी) अमळनेर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या रत्नापिंप्री,कोळपिंप्री,भिलाली,आंबापिंप्री(ता.पारोळा) येथील ५ कुटुंबांच्या वारसांना कुटुंब लाभ योजनेतील मंजूर रकमेचा धनादेश आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.यावेळी तहसीलदार अनिल गवांदे उपस्थित होते.
यात कै.धोंडू पाटील यांच्या पत्नी उषाबाई धोंडू पाटील(रत्नापिंप्री),कै. सुधाकर वडर यांच्या पत्नी मीराबाई वडर (कोळपिंप्री),कै.अरुण शिंदे यांच्या पत्नी सारिका शिंदे(कोळपिंप्री),कै.विष्णू पाटील यांच्या पत्नी सुवर्णा पाटील(भिलाली),कै.निंबा माळी यांच्या पत्नी वैशाली माळी(आंबपिंप्री), या कुटुंबातील लाभार्थी वारसांना शासनाच्या योजनेनुसार प्रत्येकी २० हजाराचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्य हिम्मत पाटील,पं.स.सदस्य अमोल पाटील,नंदलाल पाटील(सरपंच द.सबगव्हान),अंकुश भागवत(उपसरपंच-रत्नापिंप्री),सुनिल काटे (मा.उपसरपंच कोळपिंप्री) ,योगेश रोकडे(युवक रा.कॉ.),लोकेश पवार,राहुल पवार,प्रदीप राजपूत आदी पदाधिकारी तर नायब तहसीलदार राकेश शिंदे,अनिल परदेशी,गणेश नाईक,भिलासे भाऊसाहेब आदी शासनाचे अधिकारी उपस्थित होते.या सर्व लाभार्थ्यांनी आमदार अनिल पाटील,तहसीलदार व शासनाचे आभार व्यक्त केले.



