८५ लाखाच्या रस्त्याच्या कामाचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर(प्रतिनिधी)कोरोनाच्या आपत्तीत देखील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांचा धडाका लावलेला आहे.यात अंदाजित ८४ लक्ष ९९ हजार ७३१ रुपयांच्या कामाच्या रुंदीकरण व सुधारणा करण्यासाठी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पार पडले.लासुर-हिंगोणा-मठगव्हाण-पातोंडा-दहिवद-टाकरखेडा रस्त्याचा यात समावेश आहे.रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सदर कार्यक्रमास पं.स. सदस्य निवृत्ती बागुल,पं.स.सदस्य विनोद जाधव,पातोंड्याचे सरपंच भरत बिरारी,उपसरपंच नितीन पारधी, मा.सरपंच सुनिलराव पवार, मा.सरपंच रघुनाथ चौधरी,भानुदास चौधरी, प्रशांत पवार,नेहरू पवार, कांतीलाल चौधरी,राजेंद्र यादव,देविदास महाजन, श्रीकृष्ण नागे,सुनील चौधरी,बापू बिरारी,भावलाल पाटील, राजेंद्र मराठे, राहुल पवार, प्रवीण लाड, प्रफुल पवार, चंद्रकांत महाजन, संजय पवार, अतुल पवार, प्रताप महाजन, शरद पाटील, हेमंत देशमुख, स्वप्नील पवार, मंगेश पवार, ज्ञानेश्वर बेडिस्कर, लक्ष्मण महाजन, योगराज चौधरी, विष्णुदास महाजन, लालचंद चौधरी, राजमल चौधरी,वासुदेव मराठे, सचिन महाजन, नंदलाल चौधरी, तसेच युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

