धनगर समाज आरक्षणासाठी युवा मल्हार सेनेचे आमदार चिमणराव पाटील यांना निवेदन

पारोळा (प्रतिनिधी) धनगर समाज गेल्या ७० वर्षापासून आरक्षणाबाबत मागणी सरकार दरबारी मांडत आहे. परंतु सरकार त्यांच्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे उपस्थित निवेदनकर्त्यांनी मा.आबासाहेबांना सांगितले. याप्रसंगी युवा मल्हार सेनेचे समाधान धनगर, देवा लांडगे, नाना धनगर, आप्पा धनगर, सागर हाटकर, प्रविण हाटकर, बापू गढरी, सुनिल धनगर, भारत हाटकर आदी उपस्थित होते.
▶️ युवा मल्हार सेनेच्या मागण्या
१)धनगर समाजाला एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न सभागृहात मांडावा.
२)आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना १ हजार कोटींचा धनगर समाजाला त्वरित उपलब्ध करून लागू करावेत.
३)न्यायालयात याचिका क्र.४९१९/२०१७ अन्वये दाखल आहे जलद गतीने न्यायालयाने चालवावे व त्वरित सुनावणी व्हावी.
४)सदरील याचिकेवर खर्च सरकारने उचलावा व आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर भव्य स्मारक तालुक्यांमध्ये उभे करावेत.