सचिन जगताप यांची नासिक महसुल विभागातुन ई-फेरफार व ई-चावडीच्या प्रकल्प स्थायी समितीवर निवड

यावल(प्रतिनिधी)सुनिल गावडे,
तालुक्यातील किनगाव येथे मंडळ अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले कार्यतत्पर व अभ्यासु व्यक्तिमत्व शिस्तप्रिय अधिकारी सचिन जगताप यांची ई -फेरफार स्थायी समितीचे राज्य समन्यव्यक रामदास हरिभाऊ जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वयक महासंघ समीतीचे प्रदेश अध्यक्ष शाम जोशी यांनी ई-फेरफार व ई-चावङी प्रकल्प स्थायी समिती वर नासिक महसूल विभागातून मंडळ अधिकारी संवर्गातून सचिन जगताप यांची निवड करण्यात आली आहे .मा. जमाबंदी आयुक्त यांचे निदर्शनाप्रमाणे ई-फेरफार प्रणालीत देण्यात आलेल्या सुविधा या पुढे होणाऱ्या सुधारणा आणि काळानुरूप आवश्यक वाटणारे तसेच जनतेला अचूक,
तत्पर व पारदशी सेवा देण्यासाठी तसेच तलाठी मंडळ अधिकारी व अन्य वापरकर्ते यांचे कामात
आवश्यक अशी सुलभता येण्यासाठी करावे लागणाऱ्या बदलांचा अभ्यास करून त्याची उपयुक्तता
आणि सुसंगता तपासून त्या लागू करण्यासाठी तशी शासनाला शिफारस करण्यासाठी जमाबंदी
आयुक्त व संचालक भूमी अमिअभिलेख महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अध्यक्षतेखाली ई-फेरफार व ई-चावडी प्रकल्प स्थायी समित्या करण्यात आल्या असुन , दरम्यान महाराष्ट्र शासनच्या महसुलव विभाग जमावबंदी आयुक्त आणी संचालक अभी लेख विभागाअंतर्गत झालेल्या समितीच्या निवडीबद्दल फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, यावलचे तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , नायब तहसीलदार आर डी पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी , यावल तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष दिपक गवई यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी यांनी सचिन जगताप यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्यात.