जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळत नसल्याने त्रस्त;मनसेची प्रांत अधिकारी यांच्याकडे तक्रार

0

यावल (प्रतिनिधी)सुनिल गावडे
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान भरपाई साठी विमा कंपनीकडुन दिरंगाई करण्यात येत असुन , या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ विम्याची रक्कम मिळावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्याकडे एका लिखित निवेदनाद्वारे केली आहे . या संदर्भात दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोक सभा जनहीत जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी म्हटले आहे की , राज्य शासनाच्या वर्ष२०१९ते २०२०या आर्थिक वर्षासाठी पिक विमा काढलेल्या जळगाव जिल्ह्यातील सुमारे दोन हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांना मागील ९ महीन्या नंतर ही शेतकऱ्यांची पिक विम्याच्या नुकसानी रक्कम अद्याप दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विमा कंपनी कडुन नऊ महीन्या अखेर ही रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन देण्यात आले होते . दरम्यान नऊ महीन्यानंतर दिली जाणारी विम्याची रक्कम ही व्याजासकट देण्यात यावी , अग्रीकल्चर ईन्शुरन्स कंपनी ऑफ इंडीया कंपनीने जळगाव जिल्ह्यातील सुमारे ४३ हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांचा २०१९ते २०२०या आर्थिक वर्षाचा विमा काढला होता .विमा कंपनीच्या करारानुसार शेतकऱ्यांना ३० सप्टेंबर२०२०पुर्थीच विम्याची रक्कम मिळणे हे अपेक्षीत होते . मात्र विमा कंपनी शेतकऱ्यांना वेगवेगळे कारण समोर दाखवुन शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देत नसल्याची तक्रार आहे. या
संदर्भात कृषी विभागाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार जळगाव जिल्ह्यातुन विमा कंपनीच्या माध्यमातुन एक हजार ९२७ केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आणी यावल तालुक्यातील एक हजार२o२ शेतकऱ्याचा विमा काढण्यात आले असुन या सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे देणे विविध कारणांनी प्रलंबीत असल्याचे विमा कंपनीने मान्य केले आहे . दरम्यान संबधीत शेतकऱ्यांचा मेल आमच्याकडे पहोचला नाही तसेच स्थानिक बँकांकडुन शेतकऱ्यांचे कंर्फमेशन मिळत नसल्याचे व आदी कारणे विमा कंपनीकडुन पुढे केली जात आहे . या सर्व विमा कंपनीच्या गोंधळलेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या विमाची रक्कम मिळत नसल्याचे शेतकऱ्यांची तक्रार आहे . तरी विमा कंपनीने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची पिकविम्याची रक्कम आठ दिवसाच्या आत न दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेवुन आंदोलन करणार असल्याचा ईशारा लिखित निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांना देण्यात आले आहे . या निवेदनावर जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर, तालुका उपाध्यक्ष शाम पवार , मनसेचे शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, विभागीय अध्यक्ष आबीद कच्छी , विधार्थी सेने गौरव कोळी , विपुल येवले , राज शिर्के , आकाश चोपडे , प्रतिक येवले यांच्या स्वाक्षरी आहेत .

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!