डोणगाव किनगाव रस्ता मोजतोय शेवटची घटीका; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष!

▶️लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी.
यावल(प्रतिनिधी) सुनिल गावडे
यावल तालुक्यातील किनगाव ते डोणगाव असंख्य खड्ड्यांनी या अवघ्या तीन किलोमिटरच्या रस्त्याची चाळण केली आहे.मात्र यावल च्या सार्वजनीक बांधकाम विभागाचा कोणीही अधीकारी या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने परिसरातील शेतकरी बांधव व ग्रामस्थ व विशेष करून या रस्त्यावर शाळकरी मुलं नाराजी व्यक्त करत आहेत.
याबाबत माहिती अशी की,डोणगाव किनगाव हे एकुण तिन किलो मीटरचे अंतर असुन या मार्गावरून यावल(डोणगाव मार्गे) जळगावकडे दहा ते बारा बसफे-या होत असतात किनगाव पंचक्रोशीतील हे मुख्य बाजारपेठ असल्याने डोणगावकरांनसह डांभुर्णी, उंटावद व परीसरातील बहुतेक खाजगी वाहने कमी अंतराचा रस्ता असल्याने याच रस्त्यावरून वापरतात मात्र या रस्त्याची अवस्था खुपच दयनीय झाली असून या रस्त्यावरून वाहने चालवणे तर लांबाच परंतु पाई चालने सुध्दा कठीण झाले आहे या रस्त्याची किरकोळ दुरूस्ती ब-याचदा केली गेली मात्र काहीही उपयोग झाला नाही या रस्ताची रूंदी कमी असल्याने समोरून मोठे वाहन येत असतांना बाकी वाहनांना रस्त्याच्या बाजुला उभे रहावे लागते याच रस्त्यावर इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल आहे म्हणून स्कुल बसेसही याच रस्त्यावरून ये जा करतात तर डोणगावहुन शिक्षणासाठी यावल व किनगावला विद्यार्थी जातात इतकी रहदारी असल्याने हा रस्ता नवीन तयार होणे आवश्यक होते मात्र त्याची साधी दुरूस्तीही झाली नसल्याने डोणगावच्या ग्रामस्थानसह या रस्त्यावरून वापरणारे वाहन धारकही तिव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
गाव तेथे रस्ता असे शासनाचे धोरण असतांना मात्र डोणगाव किनगाव रस्ता याला अपवाद आहे असेच म्हणावे लागेल तरी सार्वजानीक बांधकाम विभागाच्या आधीका-यांना लोकप्रतीनिधींनी या बाबत जाब विचारावा व हा रस्ता लवकर नवीन बनवावा अशी मागाणी ग्रामस्थांनी केली आहे.