आ.अनिल पाटलांनी टाकला शब्द; सिंजेडा कंपनीकडून शिरसोदे आरोग्य केंद्रात दहा बेड उपलब्ध!

▶️ कंपनीचे विभागीय व्यवस्थापक, पातोंडा येथील संजय पवार यांचे लाभले सहकार्य
अमळनेर (प्रतिनिधी) मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्र सोइ सुविधांनी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आमदार अनिल पाटील करीत असताना आता त्यांच्या शब्दांमुळे शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राला सिजेंटा फॉर्म सेल प्रोडूसर कंपनी कडून दहा बेड उपलब्ध झाल्याने रुग्णांसाठी सोईचे झाले आहे.
सामाजिक कार्याचे भान ठेवत व कोरोणा काळात झालेल्या लोकांचे हाल यांची दक्षता घेत सिजेंटा कंपनीने सी एस आर फंडातून ही 10 बेडसची अनमोल भेट दिली असून या बेडसचे लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.येत्या पाच वर्षात मतदारसंघातील प्रत्येक आरोग्य केंद्र सर्व सुविधांनी परिपूर्ण असेल असा विश्वास आमदारांनी यावेळी व्यक्त केला.शिरसोदे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर व संपूर्ण स्टाफ तसेच आशा स्वयंसेविका आणि गावातील तरुण यांनी कोरोणा काळात अत्यंत चांगली कामगिरी केली, कोरोना कसा आटोक्यात येईल यासाठी अहोरात्र प्रयत्न केले यात डॉक्टर सुधाकर देसले, डॉक्टर सुनील पारोचे यांची मोलाची कामगिरी होती, त्याची दखल घेत गावातून अनेक दातृत्व पुढे येऊन प्राथमिक आरोग्य केंद्राला आरोग्यविषयक वस्तू भेट देत आहेत, यातच सिजेंटा कंपनी कडून आता 10 सुसज्ज बेडची भेट मिळाल्याने आरोग्य सेवा विस्तारली आहे.
सिजेंटा कंपनीचे बाजारात भरपूर प्रॉडक्ट असुन त्याचा सर्वात जास्त खप खान्देशात होतो आणि खान्देशात त्यांनी एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र निवडून त्याला त्याच्या फंडामधून दहा बेड भेट दिली.पातोंडा येथील भूमिपुत्र तथा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक संजय पवार यांच्या अनमोल सहकार्याने ही भेट मिळाल्याने त्यांचे कौतुक करत कंपनीचे विशेष आभार आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जितेंद्र पाटील यांनी सिजेंटा कंपनी विषयी माहिती दिली तर दयाराम पाटील यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण व्हावे अशी मागणी यावेळी केली.सदर कार्यक्रमास पंचायत समिती सभापती, उपसभापती, इंदवेचे सरपंच जितेंद्र पाटील, पारोळाचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील, शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे, सिजेंटा कंपनीचे आर.एफ निलेश गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते तर कार्यक्रमाला सिजेंटा कंपनीचे टी एम सुधीर आखाडे, कंपनीचे टि एम नितीन निकम तसेच महाळपुरचे सरपंच सुधाकर पाटील, बहादरपुरचे उपसरपंच परेश चौधरी, भोलाण्याचे सरपंच शिवाजी पाटील, बहादरपुरचे माजी सरपंच निलेश बडगुजर, भिलालीचे बाळू पाटील, आंबापिंप्रीचे सरपंच शुभांगी माळी, मनोहर माळी, ग्रामपंचायत सदस्य कचवे सर, पारोळा पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनकर पाटील, अमळनेर तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विनोद सोनवणे, शहराध्यक्ष निलेश पाटील, प्रदीप पाटील, अमोल पाटील, किशोर पवार यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर पी बडगुजर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुनील पारोचे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य केंद्राच्या सर्व स्टाफ गावातील तरुण कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
दरम्यान जितेंद्र पाटील यांनी कार्यक्रमात आमदारांनी ऑक्सीजन बेड उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली असता आमदारांनी लवकरच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले
