अमळनेर मतदारसंघात 25 बांध खोलीकरणाचे आ.अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन.

▶️ कोळपिंप्री येथे पाच तर बोदर्ड येथे वीस बांधाचे भूमिपूजन.
अमळनेर (प्रतिनिधी)नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजने अंतर्गत अमळनेर विधानसभा मतदार संघातील कोळपिंप्री येथे डेडी नाल्यावर पाच बांधाचे तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर वीस बांधाचे भूमिपूजन सोहळा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.
कोळपिंप्री येथील 5 बांध खोलीकरणाच्या कामासाठी 8.70 लाख रुपये तर बोदर्डे येथे डेडी नाल्यावर एकुण 20 बांध खोलीकरणाच्या कामासाठी 10.48 लाख रुपये असे एकुन 25 बांध खोलीकरण कामासाठी 19.17 लाख रुपये निधी मंजूर करून नुकताच भूमिपूजन करण्यात आले आहे.
यावेळी भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास कृषी सहाय्यक सुरेश लांडगे, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष दयाराम पाटील, उपसरपंच शशिकांत काटे, भरत पाटील, सुनील काटे, दीपक काटे, दत्तू काटे, सतीश काटे, महेश काटे, पृथ्वीराज काटे, जिजाबराव पाटील, गिरीश काटे प्रफुल्ल काटे, पंडित काटे, सुभाष काटे, आण्णाभाऊ काटे, नानाभाऊ शामकांत काटे, सुनील काटे, सदानंद काटे, देवानंद काटे, अनिल काटे, प्रमोद काटे, राजु काटे, योगराज काटे सह ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
यामुळे वाढणार जलसिंचन – जवळपास अनुक्रमे बोदर्डे 20 कोळपिंप्री शिवारात 5 असे 25 किमी भागात जलसिंचन वाढणार आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहीरीतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत उत्साह निर्माण निर्माण झाला आहे.