निसर्ग आणि योग प्राणायाम यांचा समन्वय ठेवल्यास मानव दीर्घकाळ जगू शकेल!- सौ मनीषा पाटील

जळगाव (प्रतिनिधी) येथील महिला पर्यावरण मंचच्या जिल्हा कार्याध्यक्ष व जिल्हा पतंजलीच्या प्रभारी सौ मनीषा पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने स्व.शांताबाई बाबुराव पाटील सभागृह, साने गुरुजी कॉलोनी मधे आयोजित योग वर्ग व वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रतिपादन केले त्या पुढे म्हणाल्या जर निसर्गाचे समतोल राखायचे असेल तर वृक्षारोपण करणे झाडे लावणे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कार्य आहे आणि आपले स्वतःचे आरोग्य निरोगी व दिर्घायु ठेवायचे असेल आणि प्रदूषणापासून पासून दूर राहायचं असेल तर योग प्राणायाम आवश्यक आहे असे मार्गदर्शन या प्रसंगी केले .
यावेळी महिला पर्यावरण सखी मंच चे राज्य समन्वयक नाना पाटील यांनी यावेळी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी योग प्राणायाम आवश्यक असून याद्वारे शरीर शुद्धी होत असते त्यामुळे आपल्या आरोग्य निरोगी राहण्यास खूप मदत होते आपले पूर्वज नैसर्गिक जीवन जगत असल्याकारणाने ते अनेक वर्ष निरोगी सुदृढ आयुष्य जगले कालांतराने या पृथ्वीवर भूतलावर वेगवेगळ्या माध्यमातून प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले वृक्षतोड भरमसाठ होऊ लागली यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडले आणि त्यामुळे अनेक रोग कोरोणा सारखे आजार निर्माण झाले त्याचे परिणाम आपण चांगल्या प्रकारे भोगत आहोत यासाठी झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे हे झाड लावताना ऑक्सीजन पूर्वक देशी झाडे लावणे आणि ते जगवणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन याप्रसंगी नाना पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी राज्य सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या योग प्राणायाम व वृक्ष रोपण कार्यक्रमाला भारत स्वाभिमानचे जिल्हा मंत्री जयश्री ताई पाटील मीडिया प्रभारी व शहराध्यक्ष नेहा जगताप जिल्हा संघटक उज्वला शिंदे कोषाध्यक्ष सुचीता वाणी पर्यावरण महिला मंच या सचिव पर्यावरण महिला मंचच्या सुचिता पाटील जिल्हा सल्लागार लीना पवार तालुकाध्यक्ष रजनी भावसार, शितल सुरत वाला, दीपा पवार, प्रतिभा सूर्यवंशी, विद्या भंगाळे ,जयश्री ठोके ,सौ कुरकुरे, श्रावणी पाटील ,राधिका पाटील त्याचप्रमाणे महिला मंचच्या सर्व पदाधिकारी आणि पतंजली योग समितीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नाना पाटील , सुरेन्द्रसिंग पाटील,किशोर पाटील ,साईनाथ पाटील, आनंद पाटील यांनी कार्यक्रम यशस्वी साठी सहकार्य केले
