रोप बँक तयार करुन देशी वृक्षाचा राज्यभर प्रसार कौतुकास्पद!-आ.संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी) येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय शिक्षक, नाना शंकर पाटील व ज्येष्ठ नागरिक रघुनाथ सोनवणे यांनी तयार केलेल्या अडुळसा व गुळवेल रोपवाटिका बँक निर्मिति केल्याबद्दल सन्मानपत्र देताना प्रतिपादन केले ते पुढे म्हणाले, प्रत्येकाकडून झाडांची लागवड जागरूकपणे होते असे नाही पण आपण वेगवेगळ्या माध्यमांतून देशी व पर्यावरणाला पुरक झाडाची प्रचार प्रसिद्धी करत आहेत. त्याचप्रमाणे समाज्याच्या आरोग्याची काळजी म्हणून अडुळसा व गुळवेल चीही निर्मिती केली हे खूप मोठे कार्य आहे,
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक नाना पाटील यानी दिव्य मराठीने प्रथम दखल घेवुन कार्यास प्रसिद्धी दिली आभार मानून पर्यावरण संदर्भात दिशादर्शक कार्य करण्यासाठी जर शासकीय जागा मिळाली तर लोकसमुहातून मोठया प्रमाणावर स्थिर कार्य ऊभे राहील तो उपक्रम सर्वांना मार्गदर्शक ठरेल.
यावेळी श्री ज्येष्ठ नागरिक अप्पा सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या सन्मानपत्र, अभिनंदन प्रसंगी डॉ. नि. तु.पाटील, आर्ट ऑफ लिव्हीग ये अमित असोदेकर व अन्य व्यक्ती उपस्थित होते.