आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची कोरोनासाठी आनंदवनला मदत

पारोळा (प्रतिनिधी) आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास मुरलीधर आमटे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मिशन आनंद- सहयोग कोविड-१९ आपत्ती निवारण कार्य मोहिमेसाठी येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद धडू भावसार यांनी रुपये दहा हजार मात्र देणगी ( मदत ) पाठवून पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे .
भावसार सर नेहमीच आपत्ती/ विपत्तीग्रस्त,आग/ अतीवृष्टीग्रस्त गंभीर रुग्ण, गोरगरीब/गरजू व्यक्तीबरोबरच राज्य/ राष्ट्र व स्वयंसेवी संस्थांना आपल्या निवृत्ती वेतनातून मदत करीत असतात.तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही समाजोपयोगी विविध उपक्रम व्यक्तिश: स्वखर्चाने राबवतात.
मिशन आनंद – सहयोग महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ विकास आमटे आणि वैद्यकीय अधीक्षक व विश्वस्त डॉ विजय पोळ यांनी भावसार सरांचे आभार मानून समाधान व्यक्त केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देखील भावसार सरांचे अभिनंदन करुन पुढील वाटचाल व निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.