आ.शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांना यश;शेळगांव बँरेजच्या पुर्णत्वासाठी १४० कोटींचा निधी मंजूर!

0

यावल ( प्रतिनिधी ) सुनिल गावडे
जळगावसह यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हरीत क्रांतीचे स्वप्न साकार करणारा महत्वकांशी प्रकल्प शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी निधीची मागणी करण्यासाठी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांची भेट घेऊन त्यांचेशी सन२०२१व२०२२ च्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची विनंती केली होती. आमदार शिरीष चौधरी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्याचे जलसंपदा ना.जयंत पाटील यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असुन. नुकतेच त्यांचे पत्र मिळाले. त्यात शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणी मध्ये रू. १४०कोटीची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आल्याचे कळविले आहे. सदर निधी मुळे शेळगांव बँरेज मध्यम प्रकल्पाचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होवून पुढील वर्षापासून पासून बँरेज मध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलीता खाली येईल असे आमदार कार्यालयाने कळविले आहे. शेळगाव बॅरेजच्या कामाला पुर्णत्वास नेण्यासाठी निधी दिल्याबद्दल आ.चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष आभार मानले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!