तापी नदीला पाणी आल्याने पुल पाण्याखाली;वाहतुकीसाठी यावल, शेळगाव,जळगाव रस्ता बंद!

यावल (प्रतिनिधी) सुनिल गावडे
तालुक्यातील शेळगाव मार्ग जळगाव जाणारा रस्ता तापी नदीला पाणी आल्याने तात्पुरता असलेला पुल व त्या वरील रस्ता बंद झाला असुन यावल ते बोरावल, टाकरखेडा मार्गावरून जळगावकडे जाणाऱ्या नागरीकांनी या मार्गाने आपली वाहने घेवुन येवु नये असे आवाहन परिसरातील नागरीकांनी केले आहे . दरम्यान यावलहुन बोरावल ,टाकरखेडा , शेळगाव . असोदा, भादली मार्ग जळगाव जाण्यासाठी कमी वेळेत जाण्याचा हा पर्यायी मार्ग असुन , या दोन दिवसात मध्य प्रदेश आणी महाराष्ट्रच्या काही भागात मोठया प्रमाणावर पाऊस पडल्याने शेळगाव बॅरेजच्या बाजुस तात्पुरत्या वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला रस्ता तापी नदीला पाणी आल्याने हा रस्ता पुर्णपणे पाण्याखाली आली असल्याने या मार्गाने वाहतुक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे . यावल व परिसरातील नागरीकांनी जळगाव जाण्यासाठी या मार्गाने येवु नये तसेच हे वृत्त आपल्या संपर्कातील ईतर मंडळींना देखील माहीती देवुन कळवावे असे आवाहान टाकरखेडा गावातील युवक मित्रमंडळी यांनी कळविले आहे .