शिरूड नाका,शिवाजी नगर भागातील सामाजिक सभागृहाचे आ.अनिल पाटील यांनी केले भूमिपूजन!

0

अमळनेर (प्रतिनिधी)आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतील शिवाजीनगर, शिरुड नाका गट नं.1438 मध्ये सामाजिक सभागृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पार पडला.
याकामासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत दहा लाखाची निधी प्राप्त झाला असून याप्रसंगी आमदार अनिल पाटील म्हणाले की, हा परिसर गेल्या दहा वर्षांपासून आपला बालेकिल्ला असून या भागाचे निवडणुकीत मोठे सहकार्य राहते. या भागासाठी आपण वेळोवेळी  विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत असेही आश्वासन आमदार अनिल पाटील यांनी यावेळी बोलताना दिले. या सभागृहासाठी या प्रभागचे नगरसेवक प्रताप शिंपी यांनी वेळोवेळी आमदारांकडे पाठपुरावा केला होता.
यावेळी नगरसेवक प्रताप शिंपी, लहू पाटील, कैलास बडगुजर, दीपक चौधरी, सुनील पाटील, महाजन सर, बापू परब, शिवसेना तालुकाप्रमुख विजय पाटील, देवेंद्र देशमुख, धनराज पाटील, वेडु पाटील, जीवन पवार, अमोल चौधरी, गुड्डू सोनार, सुनील पाटील, नानाभाऊ चौधरी आदि सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमा प्रसंगी जयहिंद व्यायाम शाळेचे सहकार्य झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!