शिवसेना नेते खा.संजय राऊत यांची आमदार चिमणराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट

पारोळा (प्रतिनिधी) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचा उत्तर महाराष्ट्र दौरा प्रसंगी आज खा. राऊत यांनी एरंडोल- पारोळाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी खा.राऊत यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.आमदार चिमणराव पाटील यांनी खा.संजय राऊत राऊत यांचा सत्कार केला,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांनीही खासदार राऊत यांचा व आलेल्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार केला.
याप्रसंगी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जळगांव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जळगांव सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना विस्तारक कुणालभाऊ दराडे उपस्थित होते.
यावेळी आमदार चिमणराव पाटील व खासदार संजय राऊत यांच्यात पक्षाच्या संघटन व मतदारसंघातील विविध विकास कामे मंजूर साठी चर्चा झाली.


