मराठा समाजाला राजकारणासाठी नव्हे युवकांच्या शैक्षणिक गरजेसाठी आरक्षण हवे!-राज्याध्यक्ष शुभम चव्हाण

यावल (प्रतिनिधी) सुनील गावडे-पाटील
मराठा समाजाला आरक्षण हे कुठल्या राजकारणासाठी नको आहे तर समाजातील आगामी पिढीतील तरुणांना शैक्षणिक आणि नोकरी संदर्भातील गरजेसाठी हवे आहे व आज पर्यंत शांततेच्या पद्धतीने मराठा समाज आंदोलन करत असून त्याचा उद्रेक पाहू नका असे प्रतिपादन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक कथा शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शुभम चव्हाण यांनी केले. ते यावल येथे मराठा आरक्षण व तरुणांच्या समस्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होते.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शुक्रवारी मराठा आरक्षण तसेच मराठा समाजातील तरुणांचा नोकरी संदर्भातील प्रश्न तसेच आणि शैक्षणिक समस्या संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती
या बैठकीमध्ये मराठा आरक्षण संदर्भात मराठा क्रांती मोर्चा कडून होत असले आगामी काळातील नियोजन, सामाजिक संघटन, यावर सखोल चर्चा आणि उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रवींद्र पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष शुभम चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक धनश्रीताई म्हस्के या होत्या तर या बैठकीमध्ये स्थानिक समाज बांधवांनी संघटीत राहून समाज हितासाठी व समाजातील आगामी पीडित साठी लढा देणे गरजेचे आहे व शांततेच्या मार्गाने हा लढा आपण दिला पाहिजे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष शुभम चव्हाण यांनी केले या
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषदेचे रवींद्र पाटील यावल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले
बैठकीत नगरपालिकेचे गटनेता अतुल पाटील, नगरसेवक प्रा. मुकेश येवले, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष देविदास पाटील, मराठा सेवा संघाचे तालुका अधक्ष अजय पाटील, संतोष पाटिल दिनेश क्षिरसागर, गणेश महाजन सह मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन युवा शिवस्मारक युवा संघर्ष समितीचे राज्य सचिव कोमल पाटील, सहसचिव अभिजीत पाटील चोपडा, जिल्हा उपाध्यक्ष अल्पेश जैन, मयुर पाटील, यांनी केले यावेळी मराठा समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अतुल पाटील,प्रा. मुकेश येवले , डी बी पाटील , सुनिल गावडे या उपस्थित होते. या बैठकीत मोजक्याच समाज बांधवांना आमंत्रित करण्यात आले होते या बैठकीत बोलताना शुभम चव्हाण यांनी सांगितले की समाज बांधवांनी राजकीय हेतू दूर ठेऊन सामाजिक हित बघावं कारण समाजातील आगामी पिढीला आरक्षण हे गरजेचे आहे म्हणून आगामी पिढीच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून समाजहितासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. तर चे सूत्रसंचलन मयुर पाटील यांनी केले