यावल शहराच्या विविध विकासासाठी नगर परिषदला निधी देण्याचे आमदार शिरीष चौधरी यांचे आश्वासन

यावल ( प्रतिनिधी ) येथील नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ.नौशाद मुबारक तडवी यांनी यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे वाढ़दिवसा निम्मित त्यांच्या खिरोदा येथील निवासस्थानी भेट घेवुन त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन केले.यावेळी आदीवासी समाजाचे युवा सामाजीक कार्यकर्ते मुबारक तडवी यावल हे सोबत होते . याप्रसंगी आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणि फैजपुर शहरच्या नगर परिषद साठी सुमारे पाच कोटी रूपयांची विविध विकासकामांसाठी मंजुर केले असुन त्यांच्या वाढ़दिवसा चे औचित्य साधून यावल नगर परिषदेलाही आपण आपल्या प्रयत्नातुन यावल शहराच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान व वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदान अंतर्गत निधी मिळुन द्यावा बाबत विनंती केली व तसे निवेदन सादर केले.
आमदार शिरीष चौधरी यांनी यावल शहरासाठी भरीव निधी देण्याचे सकारात्मक प्रतिसाद व आश्वासन दिले असुन लवकरच यावल नगर परिषदला निधी उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे .