यावल येथे वनविभागाच्या आवारात नगराध्यक्षांच्या हस्ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न!

0

यावल ( प्रतिनिधी ) येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण सप्ताह दिनानिमित्त यावल पुर्व वनक्षेत्र कार्यालय आवारात उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव एच एस पद्मनाभा यावल नगर परिषदच्या नगराध्यक्ष सौ. नौशाद मुबारक तडवी यावल वन्यजीव विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक सौ.अश्विनी खोपडे यांच्यासह विशाल कुटे (सहाय्यक वनसंरक्षक यावल तथा व.प.अ.यावल पश्चिम विभाग ), विक्रम पदमोर ( प.अ.यावल पुर्व )आनंदा पाटील (व.प.अ.गस्ती पथक यावल ), तथा आदीवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ता मुबारक तडवी यावल, ललित चौधरी (अध्यक्ष सं.व.स.वड्री खु।) दिनेश पावरा (समन्वयक वनांचल सेवाभावी संस्था जळगाव,) वनक्षेत्र यावल पुर्व, यावल पश्चिम आणि गस्ती पथक यावल क्षेत्रीय वनपाल, वनरक्षक, वनमजुर आणि कार्यालयीन कर्मचारी उपस्थितीत वृक्ष लागवड कार्यक्रम झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविका व सुत्रसंचालन विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी केले. तसेच कार्यक्रमात पद्मनाभा एच एस उपवनसंरक्षक,सौ.नौशाद तडवी नगराध्यक्ष , विशाल कुटे सहा.वनसंरक्षक,मुबारक तडवी (सामाजिक कार्यकर्ता ), आनंदा पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पर्यावरण विषयी उपस्थितांना आपले अमुल्य मार्गदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!