यावल येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष स्थापना दिवस साजरा!

यावल ( प्रतिनिधी ) येथील तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस उत्साहाच्या वातावरणात पक्षातील विविध पदावर कार्यरत असलेल्या कार्यकर्ते व पदधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला .१० जुन१९९९ साली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी पक्ष हा देशहीत , समाजहित व सर्व जाती धर्मांना बरोबर घेवुन चालणारा राष्ट्रवादी पक्ष हा जनसामान्यांचा पक्ष असल्याची भावना यावेळी दिसुन आली , यावल तालुका येथील खरेदी विक्री सहकारी संघाच्या व्यापारी संकलनाच्या आवारात आज दिनांक १० जुन रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२वा स्थापन दिवस साजरा करण्यात आला , यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , राष्ट्रवादीचे नगर परिषदेतील नेतृत्व करणारे नगरसेवक अतुल पाटील , नगरसेवक अभीमन्यु विश्वनाथ चौधरी (हेन्द्री ) , नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष राकेश कोलते ,डॉ . हेमन्त येवले, एस .पी . बोदडे, राष्ट्रवादी आदीवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष एम .बी . तडवी सर , कृषी उत्पन्न चे माजी संचालक दिनकर पाटील , युवक राष्ट्रवादीचे ॲड. देवकांत पाटील , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अब्दुल करीम मन्यार , डॉ.जी.पी.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस विजय प्रेमचंद पाटील, गिरधर काशिनाथ पाटील, गनी खान अफजल खान,वसंत पाटील, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष निवृत्ती धांडे,बापु जासुद,हितेश गजरे,मनोहर महाजन,दहीगावचे सरपंच अजय अडकमोल, कामराज घारू, अय्युब खान सर , द्वारकाबाई श्रीनिवास पाटील,सौ.शामल भावसार,सौ.उज्वला किरण,ॲड. निवृत्ती पाटील,शांताराम पाटील , ललित पाटील,गणेश महाजन , एजाज देशमुख ,श्रीराम सपकाळे, नरेन्द्र शिंदे,भरत पाटील यांच्यासह आदींनी उपस्थित राहुन राष्ट्रवादीच्या स्थापनदिनी पक्षध्वजाचे पुजन केले .दरम्यान या वेळी कोरोनाच्या संकटकाळात पक्षासाठी कार्य करणारे दुदैवीरित्या मरण पावलेल्या पक्षाच्या विविध पदधिकारी व कार्यकर्त्यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी पक्षाच्या स्थापन दिनानिमित्त उपस्थित राहीलेल्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार प्रा.मुकेश येवले यांनी मानले .