अमळनेर कोचिंग क्लासेस संघटनेने आई वडिलांचे छत्र हरपलेल्या 3 पाल्यांना घेतले दत्तक.

अमळनेर (प्रतिनिधी) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आई वडिलांचे
छत्र हरपलेल्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय येथील अमळनेर कोचिंग क्लासेस संघटनेने
(PTA)घेतलेला आहे.त्याची प्राथमिक सुरुवात म्हणून मंगळवार रोजी आई वडिलांचे छत्र हरपलेल्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप करून,करण्यात आली.येथील उप विभागीयअधिकारी व उप विभागीय दंडाधिकारी अमळनेर भाग,अमळनेरच्या आदरणीय सीमा अहिरे मॅडम यांच्या हस्ते मितेश गणेश पाटील(इ.10वी)तसेच
पियुष लोटन पाटील(इ.10वी)व हिमांशू लोटन पाटील(इ.5वी)यांना स्कूल बॅग,नोटबुक्स,कंपास बॉक्स,परीक्षा पॅड ह्या सारखे शालेय साहित्य देण्यात आले.तसेच इयत्ता 10 वी,12वी व पुढील वर्गांपर्यंत सदरील विद्यार्थ्यांना फ्री कोचिंग देण्याचे आश्वासन संघटने तर्फे देण्यात आले व ह्या 3 विद्यार्थ्यांना सध्याचे शिक्षण व पुढील शिक्षणासाठी कोचिंग क्लासेस संघटने तर्फे(PTA)दत्तक घेण्यात आले आहे,असे सांगण्यात आले.
यावेळी अमळनेर कोचिंग क्लासेस संघटना(PTA) अध्यक्ष- भैय्यासाहेब मगर सर,विनोद जाधव सर,शेखर कुलकर्णी सर,शर्मिला बडगुजर मॅडम
उपस्थित होत्या.
एक सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आई वडिलांचे छत्र हरपलले पाल्य अमळनेर तालुक्यात असल्यास आमच्या कोचिंग क्लास संघटनेशी(PTA) संपर्क साधावा,असे संघटना अध्यक्ष भैय्यासाहेब मगर सर यांनी कळविले आहे.