प्रा.डॉ.मनिष करंजे यांना पी.एच.डी.पदवी प्राप्त!

पारोळा (प्रतिनिधी) येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा.मनिष रघुनाथ करंजे यांनी इतिहास विषयात अमळनेर तालुक्यातील धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक,आर्थिक, राजकीय वाटचालीचा ऐतिहासिक आढावा(इ.स.१९०० ते २०००) याविषयावर संशोधन करून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव येथून पी.एच.डी.पदवी प्राप्त केली. त्यांना विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सुनिल सी.अमृतकर यांचे मार्गदर्शन लाभले.याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार वसंतराव मोरे,संचालक पराग मोरे,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी तथा नगरसेवक रोहन मोरे,माजी प्राचार्य बी.व्हि.पाटील, प्र.प्राचार्य डॉ. डि.आर.पाटील, उपप्राचार्य प्रा.एस.बी.भावसार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.