जागतीक पर्यावरण दिनानिमित्त अंकुशभाऊ कुमावत युवामंच ने 1000 वृक्ष लागवडचा केला संकल्प!

नाशिक (प्रतिनिधी) येथील अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्र, या शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातुन दर वर्षी नियमितपणे वृक्ष लागवड केली जाते.
वृक्ष लागवड काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंकुशभाऊ कुमावत यांचे मत आहे.
झाडे जगले तर आपण जगु या विचारांना अनुसरूण जागतीक पर्यावरण दिना निमित्त १ हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्राचे संस्थापक व पदाधिकारी यांनी केला.
महाराष्ट्र अनेक जिल्ह्यांमध्ये हि वृक्ष लागवडची मोहिम राबवण्यात येत आहे.
अंकुश भाऊ कुमावत युवा मंच महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना वृक्ष लागवड करण्याबाबत संस्थेच्या अँप वर आव्हान करण्यात आले आहे.
हि वृक्ष लागवड १ जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान करण्यात येईल असे त्यावेळी सांगितले.