बुधवार,12 मे 2021

▶️ फायझरच्या कोविड-19 लसीचा वापर 12 वर्षांपासूनच्या मुलांवर करण्यास अमेरिकी औषध नियंत्रकांची मान्यता; अमेरिकेतील शाळेत परतण्यापूर्वी किशोरवयीन मुलांना या लसीचा लाभ होणार

▶️ अँटिलिया स्फोटक प्रकरण: सचिन वाझे पोलीस सेवेतून बडतर्फ; महाराष्ट्र पोलीस सेवेतून काढून टाकण्याचा आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त यांनी केला जारी

▶️ महाराष्ट्रात 5,58,996 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 45,41,391 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 77,191 रुग्णांचा मृत्यू

▶️ गोव्यात जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला, तसेच कोकण रेल्वे मार्गावरून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य

▶️ ऑक्सिजन एक्स्प्रेस पुण्यातील लोणीत दाखल, पुणे विभागासाठी चार टँकरमधून 55 मेट्रिक टन ऑक्सिजनची वाहतूक

▶️ भारतात 36,99,661 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,93,76,651 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 2,54,225 रुग्णांचा मृत्यू

▶️ ‘म्यूकरमायकोसीस’चे चंद्रपुरात आणखी 2 रुग्ण, एकूण संख्या पोहोचली 12वर, तर अमरावती जिल्ह्यात आढळले 10 नवीन रुग्ण

▶️ मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही पत्र लिहिलं आहे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ दक्षिण अरबी समुद्रात 15 मे च्या आसपास चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता; 14 मे रात्रीपासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा

▶️अभिनेता मुकेश खन्ना यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत आपल्या मृत्यूच्या अफवांना दिला पूर्णविराम

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!