पारोळा येथे हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे 3 मे रोजी लोकार्पण!

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा-एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा संचालित हिंदूहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे लोकार्पण सोहळा हरिनाथ मंगल कार्यालय येथे 3 मे सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्रातील एकमेव अशी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल की, जिच्या माध्यमाने कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे. 25 ऑक्सिजन बेड व 75 नाॅन ऑक्सिजन बेड असे एकूण 100 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर मोफत उपचार सह सर्व सामान्य लोकांसाठी उपलब्ध होणार आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण,जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवे, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अनिल गवांदे, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंखे, सभापती तथा जेडीसीसी बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील व सर्व संचालक मंडळ यावेळी उपस्थित राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रमुख अतिथी आयोजक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.