पातोंडाचे नावलौकिक; सुमित पवार व अंशूली विसपूते एम.बी.बी.एस.उत्तीर्ण!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी राजेंद्र नारायण पवार यांचा मुलगा सुमित पवार व मुकुंद विसपूते यांची कन्या अंशूली विसपूते हे एम.जी.एम.मेडीकल काॅलेज औरंगाबाद येथून प्रथम श्रेणीत एम बी बी एस उत्तीर्ण झाले.सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने ऑनलाईन पदवी प्रदान समारंभात विद्यापीठा मार्फत पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.आई वडील, कूटूंबीय,नातेवाईक व राजेंद्र मित्र परिवारातून सुमित पवार व अंशूली विसपूते यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे. सुमित पवार व अंशूली विसपूते हे पातोंडा गावचे असल्याने ग्रामस्थांमधून देखील दोघांचे अभिनंदन करण्यात येत आहे.सुमित पवार हा त्यांच्या कुटूंबातील चौथा डाॅक्टर असणार आहे. या पूर्वी सुमितच्या कुटूंबात डाॅ कपील पवार (एम एस ऑर्थो) , डाॅ पुर्वा पवार (एम एस) व डाॅ किर्ती पवार (एम बी बी एस) असुन विविध दवाखान्यात उत्तम प्रकारे सेवा करीत आहेत. पातोंडा येथील निवृत्त शिक्षक कै.नारायण पवार यांची ती नातवंडे होत.