राजवडच्या डॉ. पाकिजा पटेल यांचे पुरस्काराचे शतक पार!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील आदर्शगाव राजवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श मुख्याध्यापिका, महिला शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षा, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकीजा उस्मान पटेल यांना बेंगलोर कडून ग्लोबल टॅलेंट आयकॉन अवार्ड 2021 या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे त्यांनी पुरस्कारांचे शतक पार केलेले आहे.
युरोप देशाकडून डॉक्टरेट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मान झालेला आहे. फिलिपाईन्स, इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका, सीरिया, या देशाकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. दिल्ली येथील मानव संरक्षण समितीवर सदस्य तसेच निसर्ग व पर्यावरण मंडळावर ज्येष्ठ सल्लागार म्हणून निवड झाली आहे. डॉ. पाकिजा पटेल यांनी सामाजिक ,शैक्षणिक पर्यावरण, क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याने त्यांना पुरस्कार बहाल करण्यात आले. पुरस्कारांच शतक पार केल्याने राजवड गावात सर्वत्र जल्लोष होत आहे. डॉ.पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.