पत्रकारांच्या मदतीसाठी ज्येष्ठ पत्रकार गो पि लांडगे यांचे आत्मक्लेश आंदोलन!

धुळे (प्रतिनिधी) मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीसाठी व संरक्षणासाठी आज धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो पि लांडगे हे त्यांच्या राहत्या घरी धुळे येथे तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख हे त्यांच्या फार्म हाऊसवर आत्मक्लेश आंदोलनास बसले आहे.
उपचाराअभावी राज्यात ११३ पत्रकारांचा मृत्यु झाला आहे,मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना अद्याप आर्थिक मदत मिळाली नाही , पत्रकारांना कुठलेही संरक्षण कवच नाही,पत्रकारांसंबधित सर्वच प्रश्नावर सरकार उदासिन आहे.पत्रकारांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एस एम देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सर्व पत्रकार संघ व सदस्यांना आज १मे रोजी आत्मक्लेश आंदोलन व उपोषण सकाळी ८ ते सायंकाळी ६ या वेळात आपापल्या घरी करण्याचे आवाहन केले होते,त्या आंदोलनास प्रतिसाद म्हणून पत्रकार श्री. लांडगे हे सकाळी ८ वाजेपासून आत्मक्लेश आंदोलन व उपोषणास बसले आहेत.